चेटूक म्हणजे काय असते - Chetuk Mhanje Kay

 

लोकांमध्ये अशी वदंता असते की झटपट श्रीमंत झालेल्या कुटुंबाकडे चेटूक असते. विशिष्ट ठिकाणी ही चेटके मिळतात. ज्याच्या घरी चेटूक आहे, तेथे वैभव असते. कारण चेटूक शेजारच्या घरातील वस्तू(पोळ्या, भाकरी इ.) अगर शेजारच्या खळ्यातील राशीमधले धान्य गुप्तपणे आपल्या मालकाच्या घरात अगर खळ्यात घेवून येते. विदर्भात चेटकाला कुसळी म्हणतात. माण-दहीवडी (सातारा) भागात त्याला पितर असे नाव आहे.

ज्याचे कारण कळत नाही अशा गूढ घटनांमागे भूत, भानामतीसारख्या अमानवी शक्तींचा हात असतो, अशी समजूत विज्ञानपूर्व काळात निर्माण झाली. विज्ञानाने आता माहित झाले आहे, की भूते नसतात. भानामती म्हणजे मानवी हाताच्या भौतिक, रासायनिक करामती असतात. चेटूक ही अशीच खुळी कल्पना आहे. जमिनीवर ठेवलेलली टाचणी मिलीमीटर इतकी हलवायची असेल तरी तिला भौतिक बल(force) लावावे लागते. कोणतीही वस्तू अदृश्य शक्तीने हालविली जाते असे जे समजतात त्यांना हे माहीत नसते की चेटका सारख्या शक्तींना हे शक्य नाही. वस्तू हलतात हे खरे असेल, तर कोणाचा तरी हात अगर इतर प्रकारचे बल हलविते; चेटूक नव्हे. वस्तू हलतात हा केवळ आभासही असू शकेल.

खरोखरच चेटके असती तर! धान्य व पोळ्या यांच्याऐवजी ती सोने अगर पैसे का पळवीत नाहीत? हुंड्यासाठी डॉक्टर जावयाला २५ तोळे सोने द्यावयाचे आहे. चेटूक घरात आणा; शेजाऱ्याचे सोने चेटकाला पळवायला सांगा. कष्ट नको. आरामात घरी बसा. श्रीमंत व्हा.

चेटूक नाही तर खळ्यातले धान्य, घरातील भाकऱ्या कशा नाहीशा होतात. खळ्यातील, धान्याच्या राशीतील धान्य नोकर हडप करीत असणार. एकत्र कुटुंबात आपला वेगळा गुप्त साठा करण्याची भावाभावांची सवय असते. एखादा भाऊ गुप्तपणे राशीतील धान्य चोरून लपवून ठेवत असेल व धान्य राशीतून नाहीसे झाल्याचा स्वतः च कांगावा करीत असेल. शेजारच्या खळ्यातील रास मोठी का? तो शेतकरी कष्टाळू, काटकसरी असतो. आळशी कुटुंबाने त्याच्यावर आळ घेणे, त्याने चेटूक केले असे समजणे हा त्या आळशांच्या कमकुवत मनाचा भाग आहे. एकत्र कुटुंबातील सुनांना स्वातंत्र्य नसते. कधी कधी सणाचे जेवण न उरण्याची अगर कमी पडण्याची शक्यता असते. अशा वेळी भुकेली सून पुरणपोळ्यांची चवड लपूवून पाटीतल्या पोळ्या नाहीशा झाल्या असा कांगावा करू शकते.


इतरांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने काळी जादू किंवा जादूटोणा जगभरात प्राचीन काळापासून विविध स्वरूपात प्रचलित आहे. जेव्हा शत्रूला थेट हल्ल्याने नष्ट करता येत नाही तेव्हा काळी जादू प्रामुख्याने वापरली जाते. या प्रकारात मृत आणि दुष्ट आत्म्यांची मदत प्रामुख्याने असते. तांत्रिक मंत्र स्मशानभूमीतील वाईट शक्तींना शांत करतात आणि त्यांना काही कार्ये करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तेथे गेल्यावर, अभागी शक्तीला बक्षीस म्हणून यज्ञ किंवा तिचे आवडते अन्न अर्पण केले जाईल.

 या प्रकाराला वूडू, भानामती, बंगाली जादू, शतकर्म, दासमहाविद्या इ. भारतात प्राचीन काळापासून प्रचलित आहे, त्याला वामाचारी तंत्र-मार्ग म्हणतात. , सरासरी प्रियकर काढा, इत्यादी अनेक उपप्रकार आहेत. जे लोक या प्रकारचे काम करतात त्यांना जादूगार म्हणतात.

 तसेच, चांगले ऊर्जा पिशाच, एक्टोप्लाज्मिक आक्रमणकर्ते आणि बरेच काही आहेत. एखादी व्यक्ती जी सामान्य निष्पाप लोकांकडून जीवन ऊर्जा किंवा जिवंत वस्तू चोरते, अशा प्रकारे पीडित व्यक्ती कंटाळवाणा/दु:खी आणि उदासीन जीवन जगते. ते अनेकदा रक्तपिपासू असतात. ती इतर चांगल्या लोकांना स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करते.

जसजसा सूर्यास्त होतो तसतसा कामाला वेग येतो. अशा प्रकारचे काम सहसा रात्री केले जाते. अशा कामासाठी मध्यरात्रीची वेळ उपयुक्त मानली जाते. अमावस्या पौर्णिमा सारखी तिथी किंवा पिठोरी अमावस्या, पितृमोक्ष अमावस्या इत्यादी विशिष्ट तिथी शुभ मानल्या जातात.


आदिमानवाला जेव्हा फक्त आभाळातून कडाडणारी वीज माहिती होती, त्यावेळी तो कदाचित घाबरून गुहेतुन प्राणाच्या भीतीनं लपून राहत असेल, पण विजेचं नक्की स्वरूप जेव्हा समजलं तेव्हा मानवाला ती आपल्या फायद्याकरता कशी वापरता येईल याचा अंदाज आला आणि हाताळायची सुरक्षित पद्धत माहित झाली. आज आपल्याला तरंगानुवर्ती, उष्णतावर्ती क्षेपणास्त्रांची माहिती झाली आहे. उष्णतेचा, तरंगांचा माग घेऊन घातकी पाठलागावर जाणारी, शेकडो किलोमीटर पर्यंत आपल्या सावजाचा पाठलाग करणारी, आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक पटीनं मारा करणारी क्षेपणास्त्रं आपण बनवली आहेत. कारण वर्षानुवर्षांच्या अभ्यासानं या शक्ती हाताळायचं ज्ञान मानवानं शोधलं आहे. पण कदाचित या गोष्टींचं अस्तित्व आपल्या प्राचीन काळच्या पूर्वजांना मान्य होणार नाही. व्हू डू मध्ये एखाद्याचा केस, रक्त, नख या गोष्टी वापरल्या जातात. आजच्या विज्ञानानं मान्य केलं आहे कि या मध्ये मानवाची गुणसूत्रं असतात जी कोट्यवधी माणसांमध्ये सुद्धा एकमेव असतात. गर्दीत नाही का एखाद्या रुमालाचा वास घेऊन कुत्री फक्त एकाच व्यक्तीला शोधून काढतात ? कदाचित काही जमातींना याचं ज्ञान असेल. वैज्ञानिक नसेल पण ठराविक कृती ठराविक क्रमानं केल्यावर हवा तो परिणाम मिळत असेल. मग ते कशाला जातील खोलात ? पाठीमागं काय होतं त्याच्याशी त्यांचं काय देणं घेणं ? व्हाट्स अँप च्या इमेजवर क्लिक केलं कि ती स्पष्ट दिसते एवढं समजल्यावर माणुस क्लीक करून मोकळा होतो, पाठीमागं काय घडतं याच्याशी त्याला काय करायचंय ?

उत्क्रांतीच्या सीमारेषेवर असलेल्या मानवाला अजूनही काही शक्तीचं स्वरूप अजून नीटस उमगलेलं नाही कदाचित अजून काहीशे वर्षांनी आज चेटुक समजल्या जाणाऱ्या या शक्तीचं स्वरूप आपल्याला नक्की माहित होईल आणि एखादं लहान मुलही सहजगत्या हाताळू शकेल.

स्रोत: विकिपीडिया आणि मराठी Quora.

PCJ

I am an enthusiastic learner and I love to write articles related to sports, Entertainment, stocks, Facts, and more.

Post a Comment

Previous Post Next Post