आजीबद्दल मनातील चार शब्द:
भारतीय परंपरेत आजी म्हणजे वडिलांची आई असते, तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो. आजी ही घरातील अशी व्यक्ती असते जी आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते, सतत उत्साही असते. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी तिच नातं जोडलेल असत तसेच जुन्या परंपरांना तिला ठाऊक असतात. तिला आपले राहिलेले सर्व जीवन आपल्या नातवंडांन सोबत घालवायचे असते आणि हिच तिची शेवटची इच्छा असते. बऱ्याचदा ती जेवताना तिच्या अवती भोवती चिमण्या व इतर पक्षी गोळा होत आणि ती तीच अर्ध जेवण त्या पक्ष्यांना देत असे तरीही तेवढेच तरतरीत आणि पूर्ण दीवसभर ती उर्जवान असे.
आजी रोज सकाळी लवकर उठतात. स्नान करून देवाची पूजा करते, आम्हा सर्वांना प्रसाद देते. ती रोज सकाळी गाऊन कविता सांगत. संध्याकाळी ती आम्हाला तिच्यासोबत फिरायला घेऊन जाते. रात्री ते आम्हाला चांगल्या गोष्टी सांगतात. आजकाळच्या पिढीला वरिष्ठ आणि मोठ्यांना आदर देणे त्यांचाबरोबर चार शब्द बोलणे त्यांच्याकडून आपल्या इतिहासाबद्दल जाणून घेणे हे सर्व विसरूनच गेले आहेत.
आजी वर कविता - Poems on Aaji in Marathi
वडील रागावले की आई वाचवते,
आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते…!
अंगाखांद्यावर खेळवते ती आजी
छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाचे सार सांगते ती आजी
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळते!
आजी म्हणजे छान छान गोष्टी
आजी म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणी
आजी म्हणजे अनुभवांची शिदोरी
आजी म्हणजे मायेची माय, दुधावरची साय!
अनुभवांनी भरलेले जीवन,
काही पावले चालून थकून जाते
जवळ गेले तर न पाहता ओळखते,
ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..!
जेव्हा आजीचा प्रेमळ हात डोक्यावर असतो
आणि तिचे प्रेम मिळते
नेहमी सुख आणि आनंदाने
आमचे आयुष्य भरून वाहते
लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमची साथ !
तिचा सुरकुतलेला हात, तिच सुकलं मनगट,
तिच्या दमल्या जीवात, कढ मायेचा तो दाट!
सर सोसली ढगांची, कळ सोसली उन्हाची,
भोवताली तिच्या मात्र दु:ख राहिलं दमटं...!
कधी लेकराची माया, कधी नातवाचा थाट,
मिळाली मात्र नाही तिला कोणाची संगत..!
दिवसाची रात्र झाली,अंधारला आसमंत,
तिने तेवला तो दिवा, तिच्या भाबड्या मनात...!
लढा तिचा एकटीचा, तिने लढला घरात,
तिच्या धैर्याची ती गाथा , माझ्या अस्पष्ट आठवांत....!
आजी स्टेटस मराठीमधे - Aaji Quotes In Marathi
आजी होतीच
माझी दुसरी आई,
प्रेमळ त्या विठूची
रखमाई😋😚
आजीचे प्रेम कमी
करू शकणार
असे कोणतेही अंतर नाही आहे,
प्रत्येक घराला एका विशेष
व्यक्तीची गरज असते
ती म्हणजे आजी😘
प्रिय आजी 💕
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨
आजी होतीच
माझी दुसरी आई,
प्रेमळ त्या विठूची
रखमाई😋😚
आजीचे प्रेम कमी
करू शकणार
असे कोणतेही अंतर नाही आहे,
प्रत्येक घराला एका विशेष
व्यक्तीची गरज असते
ती म्हणजे आजी😘
प्रिय आजी 💕
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨
आजी वर आम्हाला मिळालेले काही विडिओ गाणी आणि कविता- Some video songs and poems we found on Aaji
Aaji mhanje kay
आजी म्हणजे काय! आजी नातवाचं गोड नातं Aji mhanje Kay! /aji/Magical life with Swara
आजी गं आजी कर ना गं भाजी | बालगीते व बडबडगीते | Balgeet | Aaji ga Aaji kar na ga Bhaji | Kids song
आजी | मराठी सुंदर कविता | एकदा नक्की ऐका |
आजी आणि नातवंड।मराठी कविता।आजी नातू प्रेम
शेवटचे शब्द
आशा आहे तुम्हाला या लेखामध्ये दिलेल्या, Aaji Mhanje Kay, Aaji var kavita, aaji var kahi shabd, Some video songs and poems we found on Aaji, Poems on Aaji in Marathi नक्की अवडतील. आमचे अजून लेख वाचायचे विसरू नका.
No comments:
Post a Comment